मांजरी : कार कालव्यात पडून चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मांजरी : कार कालव्यात पडून चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर
मांजरी : कार कालव्यात पडून चौघांचा मृत्यू, दोघे गंभीरsakal

मांजरी : मित्रांसह पार्टी करून परत येताना भरधाव वेगाने जात असलेल्या कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटून घटप्रभा कालव्यात पडून रामदुर्ग तालुक्यातील बडकी गावातील चार जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. 21) मध्यरात्री ही घटना बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर शहराजवळ घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून लोकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सर्वजण रात्री मुधोळहून रामदुर्ग शहराकडे परतत होते. या घटनेची नोंद लोकापूर पोलिस स्थानकात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रामदुर्ग शहरातील सहा मित्र व मुधोळ येथील काही मित्र मुधोळहून पार्टी करून गुरूवारी मध्यरात्री परतत होते. लोकापूर शहरानजीक असलेल्या रस्त्याच्या बाजूला दगडाला ठोकरून कार कालव्यात कोसळली. कारमध्ये असलेल्या रामदुर्ग तालुक्यातील बडकी येथील कारचालक सुनील (वय 24), गुडमनाळ येथील महादेव पाटील (वय 27), येरितात कुंभार (वय 26) व विजय (वय 26) हे कालव्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी असून त्यांना लोकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. लोकापूर पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सर्व मृत बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com