सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चौघे जखमी

राजकुमार शहा 
रविवार, 20 मे 2018

अचानक कार कठड्यावर आदळली व मालट्रक वर आदळली. त्यामुळे ती एका बाजुने घासत गेली.

मोहोळ - मालट्रक व कार यांची बाजुने धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील या वली शिवारात आज रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. बालाजी गोविंद भोकरे (32) कौशल्या बालाजी भोकरे (24) हरी बालाजी भोकरे (6) तनु बालाजी भोकरे (5) सर्व रा तुळजापुर हल्ली मु. पुणे अशी जखमीची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मालट्रक क्र टी एन 34 / एस 2898 ही नगरहुन कांदा घेऊन सेलमकडे निघाली होती. त्याचवेळी कार क्र. एम एच 12/ एन एक्स 5990 ही त्याच बाजुने निघाली होती. अचानक कार कठड्यावर आदळली व मालट्रक वर आदळली. त्यामुळे ती एका बाजुने घासत गेली. त्यात वरील चौघे जखमी झाले. या अपघाताची खबर शागुल अमित (38) रा. कृष्णगिरी तामिळनाडु याने मोहोळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास हवालदार अविनाश शिन्दे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Four people were injured in the accident on Solapur Pune National Highway