संपत्तीच्या वादातून चौघांना जाळले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

बार्शी - संपत्तीच्या वादातून थोरल्या भावाने झोपेत असलेल्या आई, भाऊ, भावाची पत्नी व लहान मुलगा यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळल्याची धक्‍कादायक घटना खांडवी (ता. बार्शी) येथे शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली. कस्तुरबाई कुरुंदास देवकते (वय ६५), राहुल करुंदास देवकते (वय ३५), सुषमा राहुल देवकते (वय ३०) व आर्यन राहुल देवकते (वय २) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

कस्तुरबाई करुंदास देवकते यांनी मृत्यूपूर्व जबाब दिला. रामचंद्र हा कौटुंबिक वादातून सतत भांडण करत असे. सध्या दोन्ही देवकते बंधू एकाच घरात राहत होते. २८ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका खोलीत कस्तुरबाई, राहुल, सुषमा व त्यांचा लहान मुलगा आर्यन हे झोपले होते. तर दुसऱ्या खोलीत रामचंद्र, त्याची पत्नी व दोन मुले झोपली होती. रात्री कस्तुरबाई यांना अंगावर काहीतरी पडत असल्याचे जाणवले. त्या जाग्या झाल्या असता रामचंद्र हा पांढऱ्या रंगाच्या बादलीतून सर्वांच्या अंगावर रॉकेल टाकत असल्याचे दिसले. कोणाला काही समजण्याचा आतच रामचंद्र याने सर्वांना पेटवून दिले. 

सर्वजण जळत असतानाच राहुल याने जळत असतानाच रामचंद्रला पकडले. यात रामचंद्रही भाजला. या घटनेत सुषमा राहुल देवकते व आर्यन राहुल देवकते या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल व कस्तुरबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Four peson burned due to the property dispute

टॅग्स