महिलेसह चौघा पोलिसांची हेराफेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सोलापूर : नवीन नोटा दिल्यानंतर पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या जास्त नोटा देण्याचे आमिष दाखवून गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना लुटल्याप्रकरणी एका महिलेसह चौघा पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेला पोलिस शिपाई सचिन भाऊसाहेब ठोसर, सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील महिला पोलिस शिपाई वैशाली सीताराम बांबळे, फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सतीश रामचंद्र माने, पोलिस नाईक राजेंद्र बाबासाहेब खाडे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शिवाजी नागनाथ थिटे (वय 30, रा. दमाणीनगर, पावन गणपतीजवळ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलिस बांबळे व पोलिस ठोसर या दोघांनी नवीन नोटांच्या बदल्यात जुन्या जास्त नोटा देण्याचे आमिष दाखवून शिवाजी थिटे यांना 29 डिसेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास बाळे येथील खंडोबा परिसरात बोलाविले. तिथे आलेल्या माने व खाडे या दोघा पोलिसांनी थिटे यांच्याकडील पैशांची पिशवी जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला.

थिटे यांनी त्यांचा सहकारी राहुल याच्याकडे पैशांची पिशवी देऊन पळून जाण्यास सांगितले. तो पळून जाताना ठोसर याने राहुल याला, तुला पोलिस ठाण्यात घेऊन जातो, असे सांगून दुचाकीवर बसविले. दुचाकी पोलिस ठाण्याकडे न घेता घोंगडे वस्ती येथील चिराग भवन येथे नेले. त्या ठिकाणी इतर साथीदार पोलिसांना बोलावून घेतले. राहुल यास मारहाण करून त्याच्याकडील सतरा लाखांची रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून तिघा पोलिसांनी पळ काढला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत.

Web Title: four police arrested for deceiving