जमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी 

जमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी 

फलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली. त्यात चार पोलिस जखमी झाले. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात 20 ते 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 

फलटणमधील कुंभार टेक, गोसावी वस्तीवर अवैध जुगार अड्डा चालू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह अड्ड्यावर छापा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याठिकाणी मोठा जमाव जमला. या जमावाने पोलिस कारवाईत अडथळा निर्माण केला. पोलिसांनी बळाचा वापर करताच जमावाने दगड, विटा हातात घेऊन शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. त्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यात चार पोलिस जखमी झाले. चंद्रकांत काकडे, सतीश दडस, रत्नसिंह सोनवलकर व दिलीप येळे हे पोलिस जखमी झाले आहेत. या प्रकरणी आठ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यात चार महिलांचा समावेश आहे. 

संतोष जगन्नाथ घाडगे (रा. बिरदेवनगर), किरण विजय घाडगे (रा. जिंती नाका), जीवन विक्रम घाडगे (रा. तुपरी वसाहत, ता. पलूस), उज्वला युवराज घाडगे (रा. कुंभार टेक), अंजू संजय वाघमारे (रा. कोथरूड डेपो, पुणे), बबिता शिवाजी मोरे (रा. काले), कमल रामराव जुवेकर (रा. आझादनगर झोपडपट्टी, पनवेल), युवराज जगन्नाथ घाडगे, विजय जगन्नाथ घाडगे, किरण जगन्नाथ घाडगे, मीना विजय घाडगे, रेश्‍मा किरण घाडगे (रा. कुंभार टेक), नाना बाळू जाधव (रा. महतपुरा पेठ), तसेच अनोळखी सात ते आठ जणांनी दमदाटी केली. बाळू नाना जाधव याने जमावाला भडकावून पोलिस कर्मचाऱ्यांवर दगड व विटा फेकून मारल्या. याबाबतची फिर्याद फलटणचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी यांनी दिली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक बुरसे तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com