
जिल्ह्यात आज कोरोनाचे नवे 16 रुग्ण आढळले. त्यात पटेल चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा झाली आहे. त्यामुळे तत्काळ बॅंकेची शाखा बंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवस ती बंद राहील.
सांगली : जिल्ह्यात आज कोरोनाचे नवे 16 रुग्ण आढळले. त्यात पटेल चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा झाली आहे. त्यामुळे तत्काळ बॅंकेची शाखा बंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवस ती बंद राहील.
आज 197 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात 4 बाधित आढळले. 651 जणांच्या अँटीजेन तपासण्या झाल्या. त्यात 12 बाधित आढळले. जत तालुक्यातील 3, मिरज तालुक्यातील 2, वाळवा तालुक्यातील 1, खानापूर तालुक्यातील 2 जणांना कोरोनाची लागण झाली. सांगली शहरातील 5, तर मिरज शहरातील 3 रुग्ण आढळले. सध्या 120 जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णसंख्या 48 हजार 121 झाली आहे.
दरम्यान, बॅंकेतील या प्रकारानंतर पुन्हा एकदा लोकांचा मास्क वापरण्याबाबत आणि सॅनिटायझरच्या वापराबाबतचा हलगर्जीपणा चर्चेत आला आहे. सार्वजनिक ठिकाणी रुग्णसंख्या वाढू लागली तर अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे लोकांनी सावध रहावे, दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाची आकडेवारी अशी ः आजचे बाधित ः 16, उपचाराखालील ः 120, बरे झालेले ः 46 हजार 252, एकूण मृत्यू ः 1 हजार 749, एकूण बाधित ः 48 हजार 121.
तालुकानिहाय बाधित
आटपाडी ः 2489, जत ः 2280, कडेगाव ः 2949, कवठेमहांकाळ ः 2471, खानापूर ः 2970, मिरज ः 4545, पलूस ः 2630, शिराळा ः 2293, तासगाव ः 3411, वाळवा ः 5494, मनपा क्षेत्र ः 16 हजार 589
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली