जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत पाणीटंचाई

- विकास कांबळे
शनिवार, 4 मार्च 2017

कोल्हापूर - उन्हाळा नुकताच सुरू झाला असून, उन्हाच्या झळा वाढत असतानाच पाणीटंचाईच्या झळादेखील यावर्षी जिल्ह्याला लवकरच सहन कराव्या लागणार असल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील चार तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्‍यता असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी कळविले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे.

गेल्या वर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गावातील बोअरचे पाणी संपले होते. मे महिन्याच्या शेवटी विहिरीदेखील आटल्या होत्या. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागले. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी टंचाईचा आराखडाही गतवर्षीच्या तुलनेत कमी रकमेचा करण्यात आला. या वेळी सर्व ऋतू अतिशय कडक चालले आहेत. पावसाळ्यात खूप पाऊस पडला. हिवाळ्यात कडक थंडी पडली आणि आता मार्चच्या पहिल्या तारखेपासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. 

त्यामुळे यावर्षी कोल्हापूरचे तापमान सरासरी ओलांडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग म्हणजे हातकणंगले, शिरोळ हे कमी पावसाचे तालुके आहेत. या तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाई प्रथम जाणवत असते. या वेळी मात्र जास्त पावसाच्या तालुक्‍यांमध्ये लवकर पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. आजरा, भुदरगड, चंदगड व राधानगरी तालुक्‍यांतील काही गावांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये काही गावांना आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. जास्त पाऊस पडणाऱ्या तालुक्‍यांतील पाण्याची ही अवस्था असेल, तर ज्या तालुक्‍यात कमी पाऊस पडतो, त्या तालुक्‍यांची अवस्था आणखी दोन महिन्यांनी बिकट होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: four tahsil water shortage in kolhapur district