शिरोळमध्ये सापडले ४ क्षयरुग्ण

शिरोळमध्ये सापडले ४ क्षयरुग्ण

शिरोळ - तालुक्‍यातील क्षयरोगबाधित रुग्णांची शोधमोहीम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. ती पाच टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यातील शोधमोहिमेत चार रुग्ण आढळले आहेत. क्षयरोग बरा होत असल्याने नागरिकांनी मोहिमेत खरी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 

शिरोळ तालुक्‍यात तीन नगर परिषदा व पन्नास ग्रामपंचायती असून क्षयरोग बाधितांची शोध मोहीम आरोग्य विभागाकडून सुरू केली आहे. पहिल्या टप्प्याची शोधमोहीम ही ६ मे ते १९ मेदरम्यान दहा गावांत होणार आहे.  ती आशा स्वयंसेविका व जिल्हा आरोग्य विभागाच्या परिचारिकांद्वारे पूर्ण केली जात आहे. आशा स्वयंसेविका घर टू घर जाऊन माहिती संकलित करीत आहेत.  

क्षयरोगाची लक्षणे - 

  • संध्याकाळी किंवा अंग मोडून ताप येणे
  • पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला राहणे
  • थुंकीतून रक्‍त पडणे
  • वजन कमी होणे
  • अशक्‍तपणा, फुप्फूस व कानापाठीमागे किंवा शरीरावर इतरत्र गाठ असणे

क्षयरोगची लक्षणे असणारे संशयित नागरिक तपासणीत आढळल्यास त्यांच्यावर क्षयरोगाच्या अनुषंगाने तपासणी करुन संबंधित नागरिक क्षयरोगबाधित असल्यास त्याच्यावर आरोग्य विभागाकडून मोफत उपचार केले जात आहेत. कोंडिग्रे, यड्राव, संगमनगर-शिरोळ, औरवाड येथील तपासणीमध्ये चार क्षयरोग बाधित रुण आढळले आहेत. त्यांच्यावर  उदगाव येथील शशिकला  रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 

क्षयरोगाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. यावर शासनाकडून मोफत औषधोपचार केले जातात. उपचारादरम्यान सहा महिने पोषण आहार म्हणून प्रतिमहिना पाचशे रुपयांची मदत दिली जाते. क्षयरोगावर वेळीच उपचार केल्यास तो बरा होत असल्याने शोधमोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे.
- वाय. व्ही. कुन्नुरे,
वरिष्ठ पर्यवेक्षक, क्षयरोग विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com