'ते' चाैघे ट्रकमधून प्रवास करत यायचे अन् एटीएम फोडायचे

uk.jpg
uk.jpg

सोलापूर : अशोक चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या परराज्यातील आरोपीस गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ट्रकमधून प्रवास करत चोरटे एटीएम फोडत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

अजरुद्दीन रत्ती खॉं (रा. तेहत्र, जि. अल्वर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याची 27 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अजरुद्दीन आणि त्याचे साथीदार साजिद खान, मुशर्फ यांनी 25 ऑगस्ट रोजी अशोक चौकातील एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला होता. राजस्थान व हरियाणा राज्यातील सीमावर्ती भागातील टोळी भारताच्या विविध भागात रस्त्यावरील एटीएम मशिन फोडून चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावरून गुन्हे शाखेने चोरट्यांचा शोध घेतला. 
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. पवळ, पोलिस कर्मचारी राकेश पाटील, वसंत माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. 
 

अशी करायचे चोरी -
इंटरनेटच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरील एटीएम सेंटर शोधायचे. त्यानंतर चालकासह कंटेनर किंवा मोठा ट्रक भाड्याने घेऊन एटीएम सेंटरला जायचे. सुरक्षारक्षकांना पिस्तूल, धारदार शस्त्राचा धाक दाखवून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून गॅसकटरच्या सहाय्याने मशिन फोडून लूट केली जायची. त्यानंतर ट्रक, कंटेनरमधून पळून जायचे, अशी चोरीची पद्धत असून देशात अनेक ठिकाणी एटीएम फोडल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com