पुणे - बंगळूर महामार्गावर चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पुणे बंगळूर महामार्गावर शिरोली, सांगली फाटा येथे दुपारी अडीच वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते अडीच फूट पूराचे पाणी आहे. त्या पाण्यातूनच अवजड वाहतूक सुरू केली आहे. बंगळूरकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूने अवजड वाहतूकीसह चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू केली आहे; मात्र अद्याप मोटरसायकलला महामार्गावर प्रवेश दिलेला नाही.

कोल्हापूर -  पुणे बंगळूर महामार्गावर शिरोली, सांगली फाटा येथे दुपारी अडीच वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते अडीच फूट पूराचे पाणी आहे. त्या पाण्यातूनच अवजड वाहतूक सुरू केली आहे. बंगळूरकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूने अवजड वाहतूकीसह चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू केली आहे; मात्र अद्याप मोटरसायकलला महामार्गावर प्रवेश दिलेला नाही. पाणी अद्यापही एक फुटाच्यावर असल्याने पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे

एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसापासून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुमारे सात हजार अवजड वाहने यामार्गावर अडकून पडली होती. 

सध्या वाहतूक संथ गतीने सुरू असली तरी संध्याकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four-wheeler traffic started on the Pune - Bangalore highway