पुणे ते कऱ्हाड प्रवाशी वाहतुक सुरळीत;काेल्हापूरची बंद

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

एसटीच्या वाहतुकीच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
सातारा विभाग नियंत्रक ः 02162- 231580. 

सातारा ः पुणे-बंगळूर महामार्गवारील पुणे ते कऱ्हाड या रस्त्यावरील वाहतुक चारचाकी वाहनांसाठी सुरळीत सुरु आहे. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा देखील नियमीत उपलब्ध आहे. कऱ्हाडहून कोल्हापूरकडे सोडली जाणारी सर्व प्रकाराची वाहने किणी टोलनाका पर्यंतच नेता येऊ शकतात.
सध्या शिरवळ ते किणी टोल नाका या रस्त्यावर सुमारे साडे तीन हजार माल वाहतुक करणारी वाहने आहेत. ज्या वेळेस या रस्त्यावरील वाहतुक सुरु करण्याचे आदेश होतील. त्यावेळी ही वाहने टप्याटप्याने सोडण्यात येणार आहे. यामध्ये किणी टोल नाका, कऱ्हाडनजीकच्या तासवडे टोल नाका, सातारानजीकच्या आनेवाडी टोल नाका तसेच शिरवळनजीक थांबविण्यात आलेली वाहनांचा समावेश आहे. या मार्गावरील सर्व सहायक पोलिस निरीक्षक एकमेकांच्या संपर्कात आहेत अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस यांच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान महाबळेश्‍वरहून पोलादपूर घाटातील महाडला जाणारी वाहतुक सुरळीत आहे. साताऱ्यातील वाढे फाटा मार्गे लोणंद व फलटणची वाहतुक बंद आहे. वाहनधारकांना लिंब, शिवथर मार्गे लोणंद व फलटणला जाण्यासाठी वाहतुक सुरळीत आहे. 

एसटी महामंडळाची सेवा सुरु आहे. 
सातारा - पुणे व पुणे - सातारा विना थांबा व अन्य सेवा. 
सातारा - मुंबई व मुंबई - सातारा विना थांबा तसेच अन्य सेवा.
सातारा - कऱ्हाड सेवा. 
कऱ्हाड - सांगली वाहतुक पुर्णतः बंद.
सांगली जाण्यासाठी कऱ्हाडनजीकच्या मसूर - विटा - कडेपूर अशी वाहतुक सुरु आहे. 

एसटीच्या वाहतुकीच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
सातारा विभाग नियंत्रक ः 02162- 231580. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four wheller & bus service is ongoing at nh4 highway