सुनावणी चौथे अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात
सुनावणी चौथे अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात sakal

बेळगाव : लाचप्रकरणी चार वर्षे सश्रम कारावास

अथणी भूमापक कार्यालयातील प्रकरण

बेळगाव : शेतजमीनीच्या चकबंदीसाठी (हद्दनिश्‍चिती) लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याला ४ वर्षे सश्रम कारावासआणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अथणीतील भूमापक कार्यालयात सप्टेंबर २०१५ मध्ये लोकायुक्त पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला होता.

दौड्डवाड (ता. अथणी) येथील निंगाप्पा चन्नाप्पा पाटील यांची वीस गुंठे शेतजमीन आहे. या जमिनीचे पीटी शिट आणि चकबंदी (नकाशा) मिळवण्यासाठी भूमापक कार्यालय येथे अर्ज करण्यात आला होता. मात्र, हा अर्ज भूमापन कार्यालयातील भूमापकाकडे प्रलंबित होता. त्याबाबत अर्जदार पाटील यांनी चौकशी केली असता भूमापन कार्यालयातील भूमापक शाहीनबेगम अहमदअली कुरी हिने १५०० रुपयांची लाच मागितली.

पाटील यांनी लोकायुक्तांकडे याविरोधात तक्रार केली. लाच देताना त्यांना अटक करून त्यांच्याकडील रक्कम जप्त करण्यात आली. लाच प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा नोंदविला. पोलिस उपाधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी यांनी हा गुन्हा नोंदविला आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दाव्याची अंतिम सुनावणी चौथे अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात झाली. यात शाहीन बेगम यांच्या विरोधातील गुन्हा शाबीत झाला. ४ वर्षे सश्रम कारावासआणि १५ हजाराचा दंड ठोठाविला आहे. विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास लोकायुक्त पोलिस अधीक्षक यशोदा वंटगुडी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com