कोरोनाच्या भीतीने परदेशातील चौदा जणांना नगरला हलवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

संगमनेरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकही धास्तावले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सतर्कता बाळगली आहे.

संगमनेर ः शहरातील नगर रस्ता परिसरातील नाटकी नाल्याजवळील इस्लामपुरा मशीद व रहेमतनगरमधील दोन फ्लॅटमध्ये वास्तव्यास असलेल्या तबलिगी जमातीच्या 14 परदेशी नागरिकांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. त्यांना राहत्या ठिकाणी "क्वारंटाईन' केले होते. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांना काल (शनिवारी) रात्री नगरला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. 

शहर व तालुक्‍यात चौघे कोरोनाबाधित आढळून आल्यावर प्रशासन अधिक सतर्क झाले. शहरात आलेल्या विदेशी नागरिकांना आश्रय दिल्याबद्दल पाच जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रशासनाने राहत्या घरातच त्यांना "क्वारंटाईन' केले होते. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांच्या तपासणीचा निर्णय जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी घेतला. त्यानुसार, आरोग्य विभागाने त्यांना शनिवारी (ता. चार) रात्री जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

संगमनेरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकही धास्तावले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सतर्कता बाळगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen people migrated to Ahmednagar from abroad