बोरगावच्या पतसंस्थेत सव्वा कोटींचा अपहार 

fraud in the borgaon society
fraud in the borgaon society

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील मारुती ऊर्फ तात्या पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संस्थापकाने पतसंस्थेतील 1 कोटी 21 लाख रुपयांच्या ठेवी युनिव्हर्सल बेवरेज या खासगी प्रकल्पाकडे वळवून त्या ठेवींना 24 टक्के व्याज देतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याची फिर्याद ठेवीदार संदीप शिवाजी पाटील (वय 40) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी संस्थेचे संस्थापक मानसिंग मारुती पाटील, स्नेहलकुमार मानसिंग पाटील, जितेंद्र मानसिंग पाटील या पितापुत्रांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, "संदीप पाटील व त्यांच्या कुटुंबातील सर्वांची या पतसंस्थेत खाती आहेत. आयुष्यभर कष्ट करून साठवलेली पुंजी, शेतातून मिळालेले उत्पन्न या संस्थेत ठेवींच्या स्वरुपात ठेवले आहेत. 2015 पासून वेळोवेळी प्रत्येकाच्या खात्यावर पैसे ते भरत होते.

दरम्यान 13 मार्च 2018 ला पतसंस्थेचे संस्थापक मानसिंग पाटील यांनी आमच्या घरातील लोकांना बोलावून घेत,"पतसंस्थेतील तुमच्या खात्यावरील पैसे आमच्या युनिव्हर्सल बेवरेज पाणी शुद्धीकरण कंपनीमध्ये गुंतवा, त्या गुंतवणुकीवर तुम्हाला पतसंस्थेपेक्षा जास्त म्हणजे 24 टक्के व्याजदर मिळवून देऊ, पाणी शुद्धीकरण कंपनीच्या व्यवसायात आम्हाला भरपूर नफा होणार आहे,

आमच्या व्यवसायाचे मार्केटिंग बेंगलोर, गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व इतर शहरांमध्ये सुरू असून त्याचा तुम्हाला आम्ही भरपूर फायदा मिळवून देऊ, तुम्ही निसंकोचपणे या व्यवसायात रक्कम गुंतवा, तुमचे पैसे युनिर्व्हसल बेवरेज कंपनीमध्ये एक वर्ष मुदतीने ठेव पावत्या करुया. त्यावर तुम्हाला वर्षाला 24 टक्के व्याजदर देऊन तुमची रक्कम परत देऊ. तुमचे पैसे बुडाले तर आम्ही आमची जमीन विकून तुमचे पैसे देऊ असे सांगितले.

यावर विश्‍वास ठेवून मी पतसंस्थेच्या खात्यावरील माझे, माझी पत्नी सुरेखा, मुलगा वेदांत, मुलगी स्नेहा, आई शालन, वडील शिवाजी यांच्या नावावरील एकूण 14 लाख 68 रुपयांच्या कंपनीकडे ठेव पावत्या केल्या. या पावत्यांची मुदत 13 मार्च 2019 संपली. त्यानंतर वेळोवेळी रकमेची मागणी करण्यासाठी गेलो असता रक्कम देण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे माझ्या लक्षात आले. बोरगावातील आणखी काही लोक त्यांच्याकडे ठेव पावत्यांची रक्कम परत मागण्यासाठी येत असल्याचे मला समजले.

माझ्यासह बाळासो शंकर देसाई 1 लाख, दीपक बाळासो देसाई 1 लाख, रंजना बाळासो देसाई 1 लाख 45 हजार, अभिजित भगवान वाटेगावकर 60 हजार, भगवान श्रीपती वाटेगावकर 50 हजार, गायत्री जीवन माने 3 लाख, ओंकार जीवन माने 3 लाख, जीवन हणमंत माने अडीच लाख, दीपक ईश्‍वरा चौधरी साडे सहा लाख, दादासो आनंदराव पाटील 1 लाख, शशिकांत आनंदराव पाटील 1 लाख, जितेंद्र जयवंत पाटील 7 लाख 40 हजार रुपये, कोमल राहुल पाटील 2 लाख 90 हजार, अपर्णा अर्जुन शिंदे 1 लाख 30 हजार रुपये, आशा महादेव टिळे 1 लाख रुपये, सायली विजय वादवणे 1 लाख रुपये, तेजस विजय वादवणे 1 लाख रुपये, सुवर्णा विजय वादवणे 1 लाख रुपये, संतोष बजरंग टिळे 1 लाख रुपये, हणमंत महादेव पाटील 5 लाख रुपये, पुष्पा हणमंत पाटील 5 लाख रुपये, नीलम सतीशचंद्र पाटील अडीच लाख, सतीश चंद्र शंकरराव पाटील 2 लाख 82 हजार, संगीता काशिनाथ वाटेगावकर दीड लाख, काशिनाथ काका वाटेगावकर 1 लाख, शुभम राजेंद्र रामपुरे 50 हजार, लक्ष्मी रामचंद्र रामपुरे 50 हजार, शालन किसन शिंदे 3 लाख, अनुषा अनिल शिंदे 4 लाख, अनिल किसन शिंदे 4 लाख, तनुजा अनिल शिंदे 3 लाख 20 हजार, श्रीवर्धन अनिल शिंदे 4 लाख, दीपक मारुती पाटील 15 हजार रुपये (सर्व रा. बोरगाव), रुक्‍मिणी कैलास पाटील (नागराळे) 3 लाख 80 हजार, संतोष लक्ष्मण ढेरे (पलूस) 16 लाख यांच्यासह अन्य काही गावांतील लोकांनी युनिव्हर्सल बेवरेज कंपनीमध्ये ठेव म्हणून ठेवलेली रक्कम वेळोवेळी मागणी करुनही परत मिळालेली नाही.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com