शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

जत - शेतात सोलर सिस्टीम बसवून सरकारी अनुदान मिळवून देतो म्हणून आप्पासाहेब गळवे (रा. कोसारी, ता. जत) या शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

भारत गणपतराव हापसे (रा. उजळाईवाडी. ता करवीर), सचिन वसंत सकटे (रा. बरगेवाडी, ता. करवीर), नागेश शिवाजी चौगुले (रा. गडहिंग्लज) व जयंत घोलप (लक्ष्मीनगर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

आप्पासाहेब गळवे यांची कोसारीत शेतजमीन आहे. जानेवारी २०१८ मध्ये त्यांची सचिन प्रल्हाद जगताप यांच्याशी ओळख झाली. त्यांनी माझे मित्र रिलायबल सोलर सिस्टीम कंपनीत काम करतात, ते सोलर सिस्टीम बसवून सरकारी अनुदान मिळवून देतात असे सांगितले. अनुदान मिळत असल्याने गळवे सोलर सिस्टीम बसविण्यास तयार झाले. २४ जानेवारी २०१८ ला भारत हापसे, सचिन सकटे, नागेश चौगुले व जयंत घोलप यांनी जमिनीची पाहणी करून येथे सोलर सिस्टीम बसवता येते व मोठे अनुदान मिळत असल्याचे सांगितले.  

तसेच सोलर सिस्टीम बसवल्यानंतर काय फायदा मिळतो याची माहिती दिली. सिस्टीम पूर्ण करण्यासाठी व अनुदान मिळविण्यासाठी खर्च येत असल्याचेही पटवून दिले. सुरवातीला गळवे यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळख पत्र व सातबारा उतारा ही कागदपत्रे घेऊन गेले. कामासाठी म्हणून वेळोवेळी गळवे यांच्याकडून थोडे थोडे करत २० लाख रुपये उकळले. 

अनेकवेळा संपर्क साधूनही सोलर सिस्टीम बसवेनात व अनुदानही मिळेना त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे गळवे यांच्या लक्षात आले. त्यांनी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनी त्यांना कॉल केला पण चौघांचे मोबाईल बंद झाले होते. त्यामुळे गळवे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आज फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जत पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी  चौघांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud case in Jat taluka