दांपत्याची रस्त्यात अडवणूक करुन फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

तालुक्‍यातील माहुली ते बोरखळ रस्त्यावर दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यास अडवून काल रात्री दोन अनोळखी व्यक्तींनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सतीश राजाराम पवार (रा. बोरखळ, ता. सातारा)  यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 

सातारा: तालुक्‍यातील माहुली ते बोरखळ रस्त्यावर दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यास अडवून काल रात्री दोन अनोळखी व्यक्तींनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सतीश राजाराम पवार (रा. बोरखळ, ता. सातारा)  यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काल रात्री ते दुचाकीवरून पत्नीसह वडळवाडी (ता. सातारा) येथिल यात्रेला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते बोरखळकडे परतत असताना माहुली ते बोरखळ रस्त्यावर वडळवाडीच्या पुढे पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवले. दुचाकी थांबवल्यावर दोघांनी दमदाटी करत पवार यांच्याकडील दोन हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला. तसेच, पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर चोर दुचाकीवरुन पसार झाले. उपनिरीक्षक चेतन मछले याबाबत अधिक तपास करत आहेत.

Web Title: fraud case in satara