सांगलीः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील अनामत रकमेचा अपहार

संग्रामसिंह पाटील
बुधवार, 5 डिसेंबर 2018

इस्लामपूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवलेल्या वाळवा तालुक्‍यातील तीनशेहून अधिक उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम घेऊन तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दीड वर्षे पोबारा केला आहे. निवडणूक होऊन दीड वर्ष झाले तरी संबंधित उमेदवारांची अनामत अद्याप परत मिळालेली नाही. ही रक्कम २ लाख १४ हजार ७५० रुपये आहे.

इस्लामपूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवलेल्या वाळवा तालुक्‍यातील तीनशेहून अधिक उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम घेऊन तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दीड वर्षे पोबारा केला आहे. निवडणूक होऊन दीड वर्ष झाले तरी संबंधित उमेदवारांची अनामत अद्याप परत मिळालेली नाही. ही रक्कम २ लाख १४ हजार ७५० रुपये आहे.

चकरा मारणाऱ्या उमेदवारांचे पैसे लवकरच मिळतील, असे सांगून बोळवण केली जाते; मात्र दमडीही न मिळाल्याने पैसे मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार सविता लष्करे यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक झाली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ३१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करतेवेळी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची अनामत रक्कम म्हणून जातनिहाय निकषानुसार पैसे भरून घेतले.

अर्ज स्वीकारताना अर्जासोबत अनामत रक्कम भरल्याची मूळ पावती असेल तरच ते अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र उमेदवारांना पावती दिली नव्हती. सर्व पैसे कोषागारात जमा केले जातात. निवडणुकीदरम्यान तहसील कार्यालयातील लिपिक दिलीप भारुडकर याने कोषागारात पैसे जमा न करता धूम ठोकली. निवडणुकीनंतर ज्यांची अनामत जप्त झाली असे वगळता अन्य उमेदवारांनी अनामत रक्कमेसाठी अर्ज केल्यानंतर ती परत दिली जाते. पण हेलपाटे घालूनही हक्काचे पैसे परत देण्यात उदासीनता का? त्यामुळे या प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. 

जिल्हा परिषद   
सर्वसाधारण उमेदवार रक्कम      मागासवर्गीय उमेदवार रक्कम
 ६७ / ६७ हजार रुपये                   ३३ / १६ हजार ५००
पंचायत समिती   
 १६० / १ लाख १२ हजार      ५५ / १९ हजार २५०
 एकूण रक्कम २ लाख १४ हजार ७५० रुपये 

उमेदवारांची अनामत रक्कम घेऊन संबंधित कर्मचारी परागंदा झाला आहे. त्याला नोटीस पाठवली आहे. लवकरच रक्कम वसूल करून उमेदवारांना परत देण्याची कार्यवाही करू.
- रवींद्र सबनीस, 

तहसीलदार, वाळवा.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे सुपुत्र व माजी अर्थमंत्र्यांचे बंडखोर उमेदवार यांच्या लढाईत अनपेक्षितपणे कृषी राज्यमंत्र्यांच्या चिरंजीवाने उडी घेतली. त्यामुळे मला माघार घ्यावी लागली. वारंवार अर्ज करूनही अजून अनामत रक्कम मिळालेली नाही.
- नितीन बारवडे,
उमेदवार, बागणी जिल्हा परिषद गट

Web Title: fraud of election deposit amount in Sangli