आधी खरे दागिने देऊन घेतले कर्ज, नंतर आणले खोटे दागिने! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सोलापूर : आधी सोन्याचे खरे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले. दुसऱ्यांदा खोटे दागिने देवून 53 हजारांचे कर्ज मिळविले. फायनान्स कंपनीवाल्यांना गंडविल्याच्या आनंदात तिसऱ्यांदा कर्ज घेण्यासाठी सोन्याचे खोटे दागिने नेले. सराफाने केलेल्या तपासणीतून बिगारी काम करणाऱ्याचा खोटेपणा उघडकीस आला. याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. 

अनवर रफिक शेख (रा. शेरखान वस्ती, कोयना नगर, जिल्हा परिषद शाळेजवळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मी मार्केट परिसरातील मन्नपुरम फायनान्सचे असिस्टंट मॅनेजर सागर पोपट बोबडे (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनवर याने खरे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले. विश्‍वास संपादन केला. 7 जून रोजी दुसऱ्यांदा तो मन्नपुरम फायनान्सच्य कार्यालयात आला. त्याने आणखीन कर्ज हवे असल्याचे सांगून खोटे सोने काढून दिले. दागिने तपासणारा व्यक्ती कार्यालयात नव्हता. फायनान्स कंपनीने विश्‍वास ठेवून 53 हजारांचे कर्ज दिले. फायनान्स कंपनीला गंडविल्याच्या आनंदात अनवर शुक्रवारी पुन्हा कर्ज घेण्यासाठी आला. त्याच्याकडे खोटे दागिने होते. त्याने दागिने देवून 40 हजारांची मागणी केली. दागिने तपासण्यात आले. ते खोटे निघाले. फायनान्स कंपनीने पोलिसांना बोलावून तक्रार दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने तपास करीत आहेत. 

मित्राने दिले दागिने.. 
पोलिसांनी अनवर शेख यास अटक केली असून त्याची 11 जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत त्याने माझ्या मित्राने दानिगे दिले आहेत असे सांगितले आहे. पोलिस अनवरच्या मित्राचा शोध घेत आहेत.

Web Title: fraud with jwellery in solapur