महापालिकेत सव्वा तीन लाखाचा अपहार : लिपिकाने अनामत रक्कम केली हडप

fraud.jpg
fraud.jpg

सांगली-  महापालिकेच्या प्रभाग समिती एककडील लिपिकाने तीन लाख 29 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दत्तात्रय विठ्ठल मद्रासी असे लिपिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

अधिक माहिती अशी, की महापालिकेच्या प्रभाग समिती एककडे दत्तात्रय मद्रासी हा गेल्या सहा-सात वर्षापासून लिपिक म्हणून काम पाहत होता. त्याच्याकडे माहिती अधिकार, अनामत व बयाणा रक्कम वसूल करुन लेखा विभागाकडे भरणे, ठेकेदारांना अनामत रक्कम परत करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, सर्व प्रकारची बिले तयार करणे आदि काम सोपविण्यात आले होते. मद्रासी याने ठेकेदाराकडील वसूल केलेली अनामत रक्कम लेखा विभागाकडे भरलेली नाही. त्याने तीन लाख 29 हजार 258 रुपयांची अफरातफर केल्याचे लेखा विभागाच्या अहवालातून उघडकीस आले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त कावडे यांनी ही बाब आयुक्त नितिन कापडणीस यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी कायदेशीर अभिप्राय घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कावडे यांनी मद्रासी याच्याविरुद्ध शहर पोलिसात अपहारप्रकरणी तक्रार दाखल केली. 

सहायक आयुक्त कावडे म्हणाले, ठेकेदार महापालिकेकडे भरलेली अनामत रक्कम दोन-तीन वर्ष परत मागत नाहीत. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला नव्हता. मात्र काही ठेकेदारांनी अनामत रक्‍कम परत मागण्यासाठी अर्ज केले असता, लेखा विभागाला सदरची रक्कम जमा नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यावर आयुक्तांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, मद्रासी याने आणखी किती ठेकेदारांची अनामत रक्कम हडप केली आहे हे अद्याप समोर आलेले नाही.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com