परदेशात नोकरी लावतो, आधी प्रोसेसिंग फी भरा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सोलापूर : परदेशात हाउस कीपिंग सुपरवायझर पदावर नोकरी लावतो म्हणून सोलापूरच्या तरुणाची फसवणूक करण्यात आली. नोकरीसाठी आधी प्रोसेसिंग फी भरा असे म्हणून बॅंक खात्यावर पैसे घेण्यात आले, नंतर टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी दिल्लीच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

अजय विठ्ठलराव महिंद्रकर (वय 52, रा. गणेश सोसायटी, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 12 फेब्रुवारी 2016 पासून आजअखेर ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रेखा, अमनदीप कौर, मनमित कौर (रा. न्यू दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. ओव्हरसिस ऍडवायझर न्यू दिल्ली यांच्यामार्फत न्यूझीलंड व नार्वे येथे हाउस कीपिंग सुपरवायझर हा जॉब लावतो असे सांगण्यात आले. याकरिता प्रोसेसिंग फी म्हणून पैसे भरण्यास सांगितले. महिंद्रकर यांचा मुलगा अक्षय याने वेळोवेळी कंपनीच्या आयसीआयसी बॅंकेच्या खात्यावर 86 हजार 973 रुपये स्वीकारले. पैसे घेऊनही नोकरी लावली नाही. महिंद्रकर यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन साळुंखे तपास करीत आहेत.

Web Title: fraud saying job in foreign submit the processing fee