मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथे मोफत आरोग्य तपासणी

राजकुमार शहा
रविवार, 22 जुलै 2018

मोहोळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथील भाजपच्या वतीने आदिवासी पारधी समाज शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व खाऊवाटप मोहोळ येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी मोहोळ तालुका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंजली काटकर यांनी स्वखर्चाने खाऊ तर स्व. अभिजितदादा क्षीरसागर प्रतिष्ठानच्या वतीने भाजपाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी डॉक्टरांनी लिहून दिलेली सुमारे सहा हजारांची विविध औषधे मोफत दिली. डॉ. पाटकर यांनी या शाळेचा विद्यार्थी पुढील काळात आजारी पडला तर मोफत तपासणी करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी बबनराव गायकवाड, भाजप शहर सरचिटणीस विशाल डोंगरे, संस्थेचे प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, सोशल मीडिया तालुका सेलचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Web Title: Free Health Check up at Mohol for the Chief Ministers Birthday