मोहोळमध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी 

चंद्रकांत देवकते
सोमवार, 23 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) - शहराची स्वच्छता करणाऱ्या व शहरातील नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या महीला कर्मचाऱ्यांची संपुर्ण आरोग्य तपासणी करून नंतर शहरातील महीलांचे आरोग्य तपासणी शिबीर नगर परिषदेच्या बालकल्याण समितीच्या वतीने महिला व बालकल्याण सभापती श्रीमती. सीमा सुभाष पाटील यांच्यावतीने घेण्यात आले. 

यामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण, थायरॉइड, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, महिलांचे इतर आजार यांची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.पी.गायकवाड व डॉ.प्रीती कोणी, तसेच न.प.चे अभियंता श्री.राजकुमार सपाटे, राजू शेख, अजित दानोळे, उपस्थित होते.

Web Title: Free health check up for women in Mohol