विश्‍वजीत कदम यांच्यातर्फे  सांगलीत मोफत जेवण पार्सल 

vishwajeet.jpg
vishwajeet.jpg

सांगली- "कोरोना' मुळे लागू केलेल्या संचारबंदी व लॉकडाऊन काळात सांगली परिसरातील गरीब व गरजू लोकांसाठी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांच्याकडून मोफत जेवणाची सोय केली जाणार आहे. 31 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. 


"कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत "लॉक डाऊन' चा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. तसेच कलम 144 लावले असून संचारबंदी केली आहे. संचारबंदी आणि लॉक डाऊनमुळे सांगली परिसरातील शेकडो गरीब व गरजू लोकांच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हॉटेल, खानावळी बंद असल्यामुळे तसेच लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केल्यामुळे गरीबांच्या जेवणासाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या आहेत. 


कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी देखील गरीब व गरजू लोकांना मोफत घरपोहोच जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. सांगली जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेसचे कार्यकर्ते या काळात गरीबांना जेवणाचे पार्सल घरपोहोच करतील. दुपारी 12 ते दोन आणि रात्री 8 ते 9 या काळात जेवणाचे पार्सल दिले जाणार आहे. विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष सौरभ पाटील आणि ओंकार पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हा उपक्रम राबवतील. 
"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना अनेक अडचणी भेडसावत आहेत. परंतू कोणाला विचारणा करायची? असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. नागरिकांची ही अडचण सोडवण्यासाठी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. काही अडचण असेल तर हेल्पलाईन क्रमांक 9404069999 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com