कऱ्हाडात दुधाचा सत्याग्रह

हेमंत पवार 
गुरुवार, 3 मे 2018

कऱ्हाड (जि. सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर मोफत दुध वाटप दुधाचा सत्याग्रह आंदोलन केले.

कऱ्हाड - दुधाचा महापुर आला आहे असे सांगुन दर पाडले गेले आहेत. त्याविरोधात ३ ते ९ मे पर्यंत गावा-गावात शहरामध्ये फुकट दूध वाटून दूध उत्पादकांसाठी राज्यभर एकाचवेळी दुधाचा सत्याग्रह करण्याची भुमिका घेत किसान सभेच्या वतीने गुरुवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर मोफत दुध वाटप दुधाचा सत्याग्रह आंदोलन केले. डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. 

कऱ्हाड येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी झालेल्या आंदोलनात माणिक अवघडे, अशोक यादव, जे. एस. पाटील, सुनिल कणसे, उदय थोरात, कुमार चिंचकर, अमोल जाधव, अरुण देशमुख, आनंदा मुळगावकर, महेश पाटील आदिंसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Free milk distribution in karhad