मोफत दुध वाटण्याचे अंदोलन राज्यव्यापी करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नगर: दुधाला दर मिळत नसल्याने दुध उत्पादक कोलमडून गेला आहे. सरकार मात्र अतिरिक्त दुध झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना लुटत आहे. त्यामुळे सरकारने तोटा भरून काढण्यासाठी भावांतर योजना लागू करावी आणि तोट्याची रक्कम सरकारने शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी. खाजगी दुध संघावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा राबवावी, ग्राहकाला गाईंचे दुध पुरवावे अशी मागणी दुध उत्पादक संघर्ष समिती सरकारकडे करणार आहे असे समितीचे नेते डॉ. अजीत नवले, धनंजय धोर्डे पाटील यांनी सांगितले.

1 मे च्या ग्रामसभेत "शरम बाळगा, लुट थांबवा, शरम नसेल तर दुध फुकट न्या'' असे सांगत ठराव घेऊन अंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे समितीने अवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सात महिन्यापासून दुधाला दर मिळत नाही. त्यामुळे दुध उत्पादकांनी विकण्याएवजी मोफत दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यासंदर्भात नगरला दुध उत्पादक संघर्ष समितीची बैठक झाली. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची डॉ. अजीत नवले, धनंजय धोर्डे पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. समितीचे लाखगंगा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच दिगंबर तुरकणे, संतोष वाडेकर, दुध व्यवसाचे अभ्यासक गुलाबराव डेरे, कारभारी गवळी, विश्‍वनाथ वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

- दुध उत्पादक संघर्ष समितीचा निर्णय
- तोटा भरण्यासाठी भावांतर योजना राबवा
- ग्राहकाला मशीनचे नव्हे, गाईचे दुध पुरवा
- 1 मे च्या ग्रामसभेत ठराव घेऊन सहभागाचे अवाहन

Web Title: Free milking movement will be statewide