इस्लामपुरात मुस्लिम बांधवांकडून रूग्णांसाठी मोफत ऑक्‍सिजन पुरवठा

धर्मवीर पाटील 
Thursday, 10 September 2020

इस्लामपूर (सांगली)-  ऑक्सिजन मिळत नाही म्हणून हताश होऊ नका, आम्ही आपणाला मदत करू असे म्हणत इस्लामपूरच्या मुस्लिम समाजातील काही युवकांनी एकत्र येत ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली आहे. शहर व परिसरातील गरजू रुग्णांना ते या सेवेचा मोफत पुरवठा करत आहेत. स्वखर्चाने उपलब्ध केलेल्या या सुविधेबद्दल या युवकांचे कौतुक होत आहे.

कोरोनाचे वाढते प्रमाण चिंताजनक बनत चालले आहे. सुरवातीच्या टप्प्यात ज्या इस्लामपूरने धीराने कोरोनावर मात केली होती, त्याच इस्लामपुरात पुन्हा एकदा कोरोनाने मान वर काढल्याने यंत्रणा सैरभैर झाली आहे. रुग्णांची उपचाराची व्यवस्था होताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत ज्यांना जे जमेल त्या पद्धतीने लोकांना धीर देण्याचे काम करत आहेत. एखाद्याची अचानक ऑक्सिजन पातळी खालावली की लगेच बेड उपलब्ध होत नाहीत, आणि वेळेत उपचार सुरू होऊ शकत नाहीत, त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

तशा अनेक घटना आजूबाजूला घडतही आहेत. हा धोका ओळखून येथील मुस्लिम समाजातील काही युवकांनी एकत्र येऊन तत्काळ पन्नास हजार रुपयांची तरतूद केली आणि त्यातून ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. लोकांना ज्याप्रमाणे गरज असेल त्यानुसार मोफत ऑक्सिजन पुरविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मोहसीन पटवेकर, मकसूद भादी, आसद मोमीन, कैस इबुशे, झिशान पटवेकर, जोहर जमादार, महंमद इबुशे, अवेज इबुशे, असीम इबुशे, ताहीर मोमीन, फैज पटवेकर, सलमान इबुशे, मंनान मोमीन, सलीम बिजापूरे, साद दिवाण, फूरकान फकीर हे युवक सक्रिय आहेत.

संपर्काचे आवाहन!
ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी मोहसीन पटवेकर व मकसूद भादी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free oxygen supply for patients from Muslim brothers in Islampur