मंगळवेढ्यात जमिअत- उलमा-ए-हिंद सामाजिक संस्थेच्यावतीने मोफत पाणीपुरवठा

Free water supply through social organization
Free water supply through social organization

मंगळवेढा : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी व्याकुळ झाली असून टँकरने आलेले पाणी घरोघरी साठवले जावू लागले. त्यामुळे इतरांना पाणी कमी पडू लागल्याने ओरड होवू लागली असताना त्यात जमिअत- उलमा-ए-हिंद या सामाजिक संघटनेच्या वतीने पाच गावे व वाडीवस्तीवर मोफत पाणी पुरवले जात आहे. 

ग्रामीण जनतेची पाण्याची तहान भागवण्यासाठी 48 गावे व 532 वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवले जात आहे. दुष्काळी परिस्थीतीमुळे पाणी शासनाने निश्चीत केल्यापेक्षा जनावरांसाठी जादा घेतले जात असल्याने पुढील ठिकाणी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे वंचीत वाडीवस्तीवर पाण्यासाठी ओरड होत आहे. शासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जमिअत- उलमा-ए-हिंद  या संघटनेच्यावतीने तालुक्यातील निंबोनी रड्डे शिवणगी दामाजी नगर चोखामेळा नगर या ठिकाणी संघटनेच्यावतीने स्वतःहून पाणी टँकर सुरू केला आहे. गत वर्षी पेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जनावरांच्या छावण्या सुरु असून त्या पशुधनासाठी देखील पाण्याची मागणी जास्त आहे. परंतू पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शहर व तालुक्यातील पाण्याची भिस्त ही उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून राहिली. नदीकाठचा भाग या भागात पाणीटंचाई नसली तरी नंदुर व आंधळगाव नळपाणीपुरवठा योजना सह 39 गावातील भोसे प्रादेशिक पाणी योजनेतून पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले जात आहे. 

''दुष्काळी परिस्थितीत संघटनेच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी मोफत टँकर सुरू केले आहेत. अन्य गावातही टँकरने पाणी दिले जाणार आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहणार आहेत.''
- हाजी सलीम बागवान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com