प्रलयकारी भूकंपाच्या आठवणीं ताज्या?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

- तुळजापूर, लाहोर तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज
- १९९३ च्या भूकंपाची पार्श्वभूमी असलेल्या गावात भितीचे वातावरण
- जमिन हादरली, पत्रे हलले, मोठा आवजही झाला

उस्मानाबाद : मागील 15 ते 20 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि लोहारा या तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज ऐकायला येत आहे.
1993 च्या भूकंपाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तालुक्यांमध्ये या आवजाने भीतीच वातावरण पसरलं आहे. दोन दिवसापूर्वीही असाच आवाज लोहारा आणि तुळजापूर परिसरात ऐकायला मिळाला. त्यामुळं परिसरातील लहान मुलं आणि महिलांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. 
जामिनी हादरल्या, मोठा आवाज झाला, पतरे हलले आणि घरातील भांडे या हादऱ्याने पडले असं इकडचे प्रत्यक्षदर्शी सांगतायत. 

परिसरातील जुनी- जाणती लोक तर 1993 चा तो भयावह प्रसंग बोलताना सांगतायत, 
आम्ही जे दिवस पहिली ती पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळू नये असं ते म्हणताना दिसत आहेत. अधिकारी समोर येऊन बोलायला टाळाटाळ करतायत, भूकंपा सारखा कांही प्रकारच घडला नाही असं अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. मात्र, गावकऱ्यांची अवस्था पाहता 
प्रशासनाकडून वेळीच योग्य पावलं उचलली गेली तर संभाव्य धोका टाळला जाऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fresh of memories in Earthquake