किरकोळ कारणावरून युवकाकडून मित्राचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सातारा - मित्राला हांडगा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून युवकाचा खून केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सातारा - मित्राला हांडगा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून युवकाचा खून केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

महादू ऊर्फ महादेव सुभाष पवार (वय 40, रा. अंजली कॉलनी) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिलिंद लक्ष्मण गायकवाड (वय 46, रा. बौद्धवस्ती, करंजे) यांनी फिर्याद दिली आहे. महादू याने भोसकल्याने समीर हरिश्‍चंद्र बनसोडे (वय 28, रा. बौद्ध वस्ती, करंजे) याचा मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. 7) मिलिंद व समीर माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावरील एका वाईन शॉपच्या तळ मजल्यात दारू पित बसले होते. या वेळी समीरचा मित्र महादू शेजारी उभा होता. या वेळी महादू मिलिंद यांना हांडगा म्हणाला. त्यावरून समीर व महादू यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर मिलिंद घरी गेले. मात्र, वादावादीच्या रागातून महादूने येथील मुख्य बस स्थानकासमोर समीरच्या पोटावर नेलकटरमधील चाकूने वार केले. जखमी समीर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने तो पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. मात्र, उपचारादरम्यान काल पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे समीरचा खून केल्याप्रकरणी महादूवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: friend murder from youth in satara

टॅग्स