महाराष्ट्रातून कर्नाटकात 'नो एंट्री'; कोगनोळीत कडक बंदोबस्त

कर्नाटक लॉकडाऊन निर्बंधांची अंमलबजावणी
महाराष्ट्रातून कर्नाटकात 'नो एंट्री'; कोगनोळीत कडक बंदोबस्त

कोगनोळी : कर्नाटक शासनाने (karatnaka government) जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या (karnataka lockdown) पार्श्वभूमीवर सोमवार (१०) पासून महामार्गावर कोगनोळी फाट्यावरील सीमातपासणी (koganoli check post) नाक्यावर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. अत्यावश्यक वाहने वगळता सर्व वाहनांसह प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. येथे लॉकडाऊन निर्बंधांची कोटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे.

कर्नाटक शासनाने 10 ते 24 मे अखेरचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यास १०० टक्के यशस्वी करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी (karnatak police) बंदोबस्तात वाढ केली आहे. कोगनोळी फाट्यावर असणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्र (maharashtra) व इतर राज्यातून येणाऱ्या सर्व वाहने व प्रवाशांना परत पाठवून देण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर (RTPCR report) रिपोर्ट पाहून सोडण्यात येत होते. पण आता कर्नाटकात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये कोणालाही सोडण्यात येणार नसल्याचे सांगून महाराष्ट्रासह इतर राज्यातून येणाऱ्या लोकांना परत पाठवून देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात 'नो एंट्री'; कोगनोळीत कडक बंदोबस्त
निपाणीत कडक लॉकडाऊनची सुरुवात लाठीच्या प्रसादाने; पोलिसांची कारवाई

केवळ अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या वाहनांना सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर मालवाहू ट्रक व जीवनावश्यक साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, आर. एस. खोत, एएसआय एस. ए. टोलगी, एस. आय. कुंभार यांच्यासह सुमारे वीसहून अधिक पोलिस व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, शिक्षण विभागातर्फे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com