मोहोळ तहसीलसमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू

चंद्रकांत देवकते
सोमवार, 23 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) - मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने एक दिवसांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर वारकऱ्यांना त्रास होऊ नये. यासाठी महाराष्ट्रातील सकल मोर्चाच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीच्या परीक्षेत्राच्या  आंदोलनात बदल करून त्या त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

त्या अनुषंगाने आज तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवानी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. सकाळी ११. वाजता आंदोलन स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून मराठा समाजाच्या मागण्याबाबत विलंब करीत असलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी ठिय्या आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. 

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख काकासाहेब देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्ययक्ष तथा पंचायत समीतीचे सदस्य अंजिक्यराणा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, राष्ट्रवादीचे नगर परिषदेचे गटनेते प्रमोद डोके, माजी सरपंच तथा नगरसेविका सिमाताई पाटील, नगरसेवक सत्यवान देशमुख, संतोष गायकवाड सर, महेश देशमुख, दिलीप गायकवाड, अॅड श्रीरंग लाळे, अॅड हेंमत शिंदे, विजय कोकाटे, मुकेश बचुटे, पिंटु काळे, महेश मसलकर, आकाश पाटील, किसन पाटील, नाना गायकवाड, बाळासाहेब पवार, चटके साहेब, चिंतामणी देशमुख, रणजीत गायकवाड, किरण शिंदे, प्रदीप साठे, महादेव डोके, शिवाजी चव्हाण, महेश पवार, हेमलता माने, नाना डोके, आदी सह बहुसंख्य समाज बांधव उपस्थीत आहेत. दिवसभर होणाऱ्या या ठिय्या आंदोलनात तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील अनेक सकल मराठा समाज बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे.

Web Title: In front of Mohol Tehsil, the movement of Maratha community continues