एफआरपीतील वाढ म्हणजे सरकारकडुन शेतकऱ्यांचा विश्वासघातच  - राजु शेट्टी

Raju-Shetty
Raju-Shetty

कऱ्हाड - सरकार जरी एफआरपी वाढवली असे सांगत असले तरी हिशोबात घोळ करुन शेतकऱ्यांचा विश्वासघातच सरकारने केला आहे, अशी टोला खासदार राजु शेट्टी यांनी आज कऱ्हाड येथे सरकारला लगावला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे.  त्यामुळे कमळ औषधालाही ठेवणार नाही असे मी जाहीर केले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कमळाने विश्वासघात केला आहे. त्यावर कोणते तननाशक फवारायचे हे ऊस उत्पादकांनीच ठरवावे, असे आवाहनी त्यांनी यावेळी केले.

दुध आंदोलनानंतर पहिल्यांदाच खासदार शेट्टी कऱ्हाडला आल्याने त्यांचे जंगी स्वागत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व पदाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले,  एकाबाजुला 2550 रुपयांची एफआरपी 2750 केली असे सांगुण स्वतःचीच पाठ स्वतः थोपटुन घ्यायची आणि साडेनऊ टक्के रिकव्हरीचा बेस 10 टक्के करुन टनाला 145 रुपये शेतकऱ्याचा तोटा करायचा असे धोरण सरकारने घेतले आहे. सध्याची एफआरपी 10 टक्के रिकव्हरीला 2750 आणि त्यानंतरच्या प्रत्येक रीकव्हरीला 289 रुपये असे गणीत आहे. त्यामुळे अर्धा टक्याला 145 रुपये मिळणार. 289 रुपयातुन 145 वजा केल्यावर 55 रुपयेच फक्त एफआरपी वाढते. त्यामुळे हिशोबात घोळ करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात करायचा अधिकार सरकारला कोणी दिला ? हिंदी चित्रपटात जीवन हे मुनीमाची भुमिका चांगली वटवत होते. मुनीन ज्याप्रमाणे हिशोबात घोळ करुन शेतकऱ्यांना चुना लावण्याचे काम करत होते, त्याप्रमाणे सरकारने करुन हिशोबात शेतकऱ्याला फसवले आहे. सरकारने हे जाणुनबुजुन केलेले आहे. त्यामुळे हे सरकार शेतकर्यांच्या विऱोधातील आहे. एफआरपीमध्ये छेडछाड केली तर कमळ औषधालाही ठेवणार नाही असे मी जाहीर केले होते.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कमळाने विश्वासघात केला आहे. त्यावर कोणते तननाशक फवारायचे हे ऊस उत्पादकांनीच ठरवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (व्हीडीओ - हेमंत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com