जमीन खरेदी विक्रीच्या माध्यमातून घातला गंडा

राजकुमार शहा 
सोमवार, 4 जून 2018

जमिन खरेदी व विक्रीच्या माध्यमातुन 6 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष बापु चव्हाण रा. टाकळी सिकंदर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मोहोळ - जमिन खरेदी व विक्रीच्या माध्यमातुन 6 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष बापु चव्हाण रा. टाकळी सिकंदर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मोहोळ पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आढेगाव येथील नवनाथ भागवत डोंगरे यांनी टाकळी सिकंदर येथील संतोष बापु चव्हाण यांची जमीन 29 लाख रुपयांना खरेदी घेण्याचे ठरले. मात्र मला पैशाची अत्यंत अडचण आहे असे सांगुन चव्हाण याने 29 लाखांपैकी साडेचार लाख रुपये डोंगरे यांच्याकडुन घेतले व खरेदी वेळी मुळ किमतीतुन ते वजा करून घ्या असे सांगीतले. 

दरम्यान, दि. 26 एप्रील रोजी खरेदी झाल्यानंतर संतोष चव्हाण याने साडेचार लाख रुपये वजा करू नका मी तुंम्हाला नंतर देतो असे सांगीतले. खरेदी व्यवहार झाल्यावर नवनाथ डोंगरे हे जमीनीची नोंद लावण्यासाठी तलाठ्याकडे गेले असता तलाठयाने जमिनीवर बँकेचा बोजा आहे. तो कमी करुन आणल्याशिवाय नोंद करता येणार नाही, असे सांगीतले. डोंगरे हे पुळुज येथील आयसीआय बँकेत गेल्यावर चव्हाण याने चालु खात्यातुन 1 लाख 41 हजार रुपये उचलल्याचे बँकेच्या आधीकाऱ्याने डोंगरे यांना सांगीतले मात्र संतोष चव्हाण याने ही गोष्ट डोंगरे यांच्यापासुन जाणुन बुजुन लपवुन ठेवली त्यामुळे आपली एकुण 5 लाख 91 हजाराची फसवणुक झाल्याचे लक्षात आले याबाबत नवनाथ डोंगरे यांनी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे.

Web Title: fruad in Land purchase case

टॅग्स