कोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर पसरले आहे. झेडपी चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत रस्ता मोठा झाला, तरी त्यावर किरकोळ विक्रेते वाहने, हातगाडे लावून बिनधक्‍कतपणे बाजार मांडत आहेत. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष सुरू आहे.

साताऱ्यातील अतिक्रमणांचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटील होत आहे. ‘भटला दिली ओसरी भट हातपाय पसरी’ अशी स्थिती होत असून, अतिक्रमणधारकांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्याला स्थानिक प्रशासनाकडून वेळीच आळा घातला जात नसल्याने त्यांचे फावत आहे. पोवई नाका ते कोरेगाव रस्त्याचे कृष्णानगरपर्यंत चौपदरीकरण केले आहे. त्यामुळे शहरातील हा एक प्रमुख रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून मोठा बनला आहे. मात्र, त्याचा फायदा किरकोळ विक्रेते उठवू लागले आहेत. झेडपी ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकादरम्यान विसावा नाका, सैनिक स्कूलच्या मैदानासमोर तर चक्‍क रस्त्यातच विक्रेत्यांनी ठाण मांडलेले आहे. फळ, भाजी, खाद्यपदार्थ विक्रेते रस्त्यावर वाहने उभी करून व्यवसाय करत आहे.

मुरूम टाकला कोणासाठी?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोवई नाका कार्यालयाच्या पाठीमागील वायसी कॉलेज ते पोवई नाका या रस्त्यावर पूर्वी पादचाऱ्यांना चालताही येत नव्हते, इतकी घाण रस्त्यालगत होती. पावसाचे पाणीही साचत होते. त्यावर ठेकेदार टी ॲण्ड टी कंपनीने मुरूम टाकून साइडपट्ट्या व्यवस्थित केल्या आहेत. मात्र, त्यावरून वाहतुकीच्या रिक्षांची रांग लागली असते. त्यामुळे हा मुरूम नक्‍की कोणासाठी टाकला, असा प्रश्‍न पादचारी उपस्थितीत करत आहेत.

Web Title: fruit stall on koregaon road