मोहोळ नगरपरिषदेला अखेर पुर्णवेळ स्थापत्य अभियंता

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील घरकुल, त्याचे लाल फायलीत अडकलेले अनुदान, नवीन शॉपींग सेंटर, दीड दोनशे वर्षापुर्वी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या एैतहासीक विहिरीची डागडुजी व सुव्यवस्था, पक्के व मजबुत रस्ते, बंदीस्त गटारी आदी अधिकाऱ्याविना रखडलेली अनेक लोकोपयोगी योजना मार्गी लागणार असल्याची माहीती नगराध्यक्ष वंदना संतोष सुरवसे यांनी दिली.

नगरपरिषद स्थापन झाल्यापासुन गेली अडीच वर्ष जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी पुर्णवेळ अधिकारी मिळाल्या नसल्याकारणाने शहरांतर्गत असलेल्या घरकुलाची, बांधकाम परवाण्याची तसेच विविध योजनांची कामे रखडली होती. याबाबत नगराध्यक्ष वंदना सुरवसे, बांधकाम समितीचे सभापती दत्तात्रय खवळे, पाणीपुरवठा सभापती संतोष खंदारे, संतोष सुरवसे, आण्णा फडतरे आदींनी महिनाभर सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर नगरपरिषद साठी दोन 'अ 'व' ब' वर्गाचे कायमस्वरूपी दोन स्थापत्य अभियंत्यांची जिल्हा प्रशासनाने नियुक्ती केली आहे.

नवीन स्थापत्य अभियंता मनोज खटके यांनी पदभार घेतला असुन, यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, गटनेते प्रमोद डोके, अण्णा फडतरे, सुरेश कांबळे, पाणीपुरवठा अभियंता अमित लोमटे, कोंडीबा देशमुख, सतीश आठवले, अस्वरे आदी उपस्थित होते.

Web Title: full time Civil Engineer to Mohol Municipal Council