पारायण सोहळ्यात आमदार देसाईंनी खेळली पत्नीसोबत फुगडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पारायण दिंडी सोहळ्यातील समाप्तीवेळी आमदार देसाईंनी पत्नी स्मिता देवींसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. त्यांच्या या फुगडीची पाटण तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली. 

मल्हारपेठ : पारायण दिंडी सोहळ्यातील समाप्तीवेळी आमदार देसाईंनी पत्नी स्मिता देवींसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. त्यांच्या या फुगडीची पाटण तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली. 

दौलतनगर( ता.पाटण) येथे लोकनेत्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभावेळी दिंडी सोहळा साजरा केला जातो यावेळी देसाई कुटुंबियांच्या व पारायण सोहळा समितीच्या वतीने सर्वच धार्मिक कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभावेळी भव्य दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी स्वतः आमदार देसाईनी डोक्यावर टोपी हातात टाळ घेऊन सर्वांसमवेत दिंडी सोहळ्यात फेर धरला होता.

आमदार देसाई स्वतः सोहळ्यात सामील असल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला होता. कारखान्याचे संचालक कर्मचारी पदाधिकारी स्वतः आमदार देसाईंच्याबरोबर सपत्नीक दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.  

या दिंडी सोहळ्यात आमदार देसाईंच्या सुविध्य पत्नी स्मितादेवी यानी वारकर्यांच्या आग्रहस्ताव फुगडी खेळण्याचा आनंद लुटला त्यांच्या या फुगडीची तालुक्यात चांगलीच खुमासदार चर्चा झाली. दरम्यान, तालुक्यातील सर्वच समारंभात आमदार देसाई हिरहिरिने भाग घेतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.

Web Title: In Function MLA Desai Plays Fugdi with their wife