महिंद धरणास ११.५५ लाख निधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

कऱ्हाड - पाटण तालुक्‍यातील महिंद लघुपाटबंधारे योजनेच्या जुन्या कामांसाठी सुमारे ११ कोटी ५५ लाख ३७ हजारांच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय निधीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यातून काही महत्त्वाची कामे हाती घेण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. योजनेस तो निधी लवकरच सुपूर्त होणार आहे. त्यामुळे निधीतून विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. 

ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद लघुपाटबंधारे धरणाची सिंचन क्षमता ३०४ हेक्‍टर आहे. धरणाची क्षमता दोन हजार ४०४ दशलक्ष घनमीटर आहे. महिंदच्या कामासाठी दहा कोटी ९० लाख १३ हजारांचा निधी तर अनुषंगिक कामासाठी ६५ लाख २४ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिंद प्रकल्पाचे काम सुरू असताना दूरसूचीतील वाढ, भूसंपादन किंमतीतील वाढ, संकल्प चित्र बदलामुळे वाढ, अपुरी तरतूद आदी कारणांमुळे २००९-१० ची दूरसूची वापरून सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ते ११ कोटी ५५ लाख ३६ हजार इतके आहे. त्याच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिला होता. त्याला १५ फेब्रुवारी २०१८ रोजी तांत्रिकदृष्ट्या मान्यताही मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात तो निधी वर्ग करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामळे ‘महिंद’च्या जुन्या कामांचा प्रस्तावित निधी मंजूर झालेला आहे. ‘महिंद’ला मंजूर झालेल्या निधीतून भूसंपादन, धरणाचा सांडवा, चॅनेल व धरणाची दुरुस्ती प्राधान्याने केली जाणार आहे.

दळणवळणासह देखभाल दुरुस्तीसाठीही शासनाने निधी मंजूर केला आहे. त्याशिवाय काही नवीन प्राथमिक कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर आहे.

Web Title: fund to mahind dam