सुनेने 'यांच्या'वर केले अंत्यसंस्कार

अण्णा काळे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- अस्थीचे विसर्जन न करता शेतात अस्थी विसर्जन करून केले वृक्षारोपण 
- करमाळ्यात आगळ्यावेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार
- मुलीप्रमाणे सासूकडून सुनेला वगणुक
- सुनेचे पदवीपर्यंत शिक्षण

करमाळा (सोलापूर) : आई वडिलांना वृध्दापकाळात व्यवस्थित सांभाळले जात नसल्याच्या अनेक तक्रारी वाढलेल्या असताना आजारपणात आपल्या वृध्द सासुची मनोभावे सेवा केली. सासुबाईच्या मृत्यूनंतर सासुची सेवा करणार्या सुनेच्या हास्ते आपल्या आईचे अत्यंतसंस्कार करण्याचा निर्णय मुलगा सचिन अब्दुले यांनी घेतला आणि सेवा करणा-या अश्विनी सचिन अब्दुले यांच्या हास्ते सासुचे अत्यंतसंस्कार नंतरचे सर्व कार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अंत्यसंस्कार नंतर अस्थीचे विसर्जन न करता शेतात अस्थी पुरून त्यावर वृक्षारोपण करून एक वेगळा पायंडा पाडला आहे. 

हेही वाचा : अजित पवारांना बारामतीकरांनी घातली भावनिक साद; पहा काय?
करमाळा (घोलपनगर) येथील सेवानिवृत्ती मुख्याध्यापिका रामकुवर मुरलीधर अब्दुले (वय ७८) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अब्दुले यांनी 25 वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणुन सेवा केली. त्यांचे पती मुरलीधर अब्दुले हे ही सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना सचिन अब्दुले हा एकुलता एक मुलगा आहे. ते येथील महात्मा गांधी विद्यालयात सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. रामकुवर अब्दुले या वर्षाभरापुर्वी घरात पाय घसरून पडल्या. तेव्हापासुन त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. गेली अनेक महीने त्या घरातच बेडवर पडुन होत्या. या कालावधीत त्यांची सुन अश्विनी सचिन अब्दुले यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या जखमेला ड्रेसिंग करण्यापासुन सर्व कामे सुन अश्विनी करत होत्या.
अश्विनी अब्दुले या पदवीधर आहेत. त्यांनी घरातील सर्व कामे स्वतः करत सासु बाईची सेवा केली. त्यामुळे त्यांचे सर्वञ कैतुक होत आहे. अश्विनी यांच माहेर जिंती (ता. करमाळा) हे. त्यांचे वडिल किसन कांबळे हे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असतात.

हेही वाचा : आता मोठ्या भावाला भेटायला दिल्लीत जाणार : उद्धव ठाकरे
आश्वीनीने हातचा राखला नाही

माझी आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. आई आजारी पडल्यावर पत्नी आश्वीनीने आईची खुप सेवा गेली.कधीही सेवा करताना हातचा राखला नाही.आईच्या निधनानंतर अत्यंसंस्काराच्यावेळी स्वतःच पत्नी आश्वीनीच्या हास्ते सर्व कार्य करण्याचा निर्णय घेतला.याला वडीलांनी ही तात्काळ होकार दिला.
- सचिन अब्दुले, मुलगा, करमाळा. 

हेही वाचा : महाराष्ट्रात ठाकरे सरकार! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
मला मुलीप्रमाणे सांभाळले

आमच्या छोट्या कुंठुबात मला मुली प्रमाणे सासुबाईनी सांभाळले. त्या आजारपणातुन ब-या होतील अशी आम्हाला आशा होती. माञ त्या आमच्यातुन गेल्या. मला आईचे प्रेम त्यांनी दिले. माझ्या हातून अंत्यसंस्कार व इतर कार्य करावे असे माझे पती अब्दुले सरांनी ठरवले आणि मी ते केले. ही घटना माझ्या कायम स्मरणात राहील.
- अश्विनी अब्दुले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral from mother-in-law