व्हिडीओ कॉलिंगद्वारे पोटच्या गोळ्याचे अंत्यदर्शन 

प्रकाश तिराळे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुरगूड - लेकीचे आकस्मिक जाणे मनाला चटका लावून गेले; पण त्याहीपेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे पोटच्या गोळ्याचे अंत्यदर्शनदेखील व्हिडीओ कॉलिंगद्वारे घेण्याची वेळ बापावर आली. महापुराच्या थैमानात काळिज चिरणारे हे एक उदाहरण आहे. कागल तालुक्‍यातील कुरुकली येथील विलास पाटील असे दुर्देवी बापाचे नाव आहे. 

येथील माहेरवाशिणी पल्लवी प्रभाकर पाटील (वय 27, रा. नांदोली ता. भुदरगड) पती व सासरकडील कुटूंबासह पुण्यात राहत होती. चार दिवसापासून ती तापाने आजारी होती. आई वंदना पुण्याला दोन दिवसापूर्वी सेवेसाठी गेल्या. खाजगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरु होते. चार महिन्याची बाळंतीण असणारी पल्लवी पतीसमवेत मोटरसायकल वरुनच दवाखान्यात दाखल झाली होती. पण तिचा ताप हा डेंग्यूचा असल्याचे निदान लवकर झाले नाही. आणि सोमवारी रात्री तिचे निधन झाले.

पुण्यात धुवॉंधार पाऊस कोसळत होता.आणि हिकडे कुरुकलीत तर पावसाने थैमानच घातले होते. रस्ते बंद असल्यामूळे पुण्याला जाणे अशक्‍यच होते.अखंड रात्र त्यांनी मुलगीच्या आठवणीने व्याकूळ होवून काढली. पल्लवीचे सासर नांदोली; पण पुण्याहून तिचे पार्थिव हिकडे आणणे महाकठीण,कारण तिकडे जाणारे सर्वच रस्ते बंद आहेत. त्यामुळे आज तिच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार केले. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे तीचे वडील विलास पाटील यांना तिचे अंतिम दर्शन व्हीडीओ कॉलिंगद्वारे घ्यावे लागले.त्यांच्यासह कांही नातेवाईकांनाही असेच अत्यंदर्शन घ्यावे लागले. पुराच्या थैमानाने एका बाप - लेकीची शेवटची भेटही झाली नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: funeral seen by video calling special story