नेवाशात गडाख-मुरकुटे सोशल मिडियावर वाद पेटला

नेवाशात गडाख-मुरकुटे सोशल मिडियावर वाद पेटला

नेवासे : गेल्या चार-पाच दिवसांपासून राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एकत्रित फोटो व भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे 'राष्ट्रवादीच्या वाटेवर हो पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली असून यामुळे आमदार मुरकुटे व त्यांच्या समर्थकांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याने रविवारी याप्रकरणी नेवासे पोलिसांत माजी आमदार शंकारराव गडाख यांच्या तिघा समर्थकांवर तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

तालुक्यात सध्या वरील ज्येष्ठ नेते शरद पवार, मुरकुटे व घुले यांचे एकत्रित छायाचित्र व भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे 'राष्ट्रवादीच्या वाटेवर या पोस्टची जोरदार चर्चा चालू असून यामुळे मुरकुतेंविषयी तालुक्यात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. यावेरून नेवाशा गडाख-मुरकुटे समर्थकांत सोशल मिडियावर चांगलेच युद्धं पेटले आहे.  

याप्रकरणी आमदार मुरकुटेंचे स्वीय सहाय्यक सुनील मोरे यांनी नेवासे पोलिसांत यश दरंदले, महेश उगले व सुनील जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली असून त्यात आक्षेपहार्य फोटोसह भाजपाचे आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर माजी आमदार चंद्रशेखर घुले, अजित पवार आणि भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची पुणे येथे गुप्त बैठक पार पडली आशा आशायाचा मजकूर सोशल मीडियावर जाणीवपूर्वक प्रसारित करून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची भाजपमध्ये व समाजात बदनामी केलेल्याचे म्हणाले आहे.  याबात तपास चालु आसुन लवकरच संबधीतांवर कारवाई करु आसे पोलीस प्रशासनाने सांगितले. दरम्यान गडाख-मुरकुटे समर्थकांचा सोशल मीडियावरचा वाद पोलिसांत जाण्याची ही सहा महिन्यातीली तिसरी घटना आहे.

राष्ट्रवादी वादापासून अलिप्त
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या त्या छायाचित्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आहेत. तर पोस्ट मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उल्लेख आहे. मात्र तालुक्यात गडाख-मुरकुटे समर्थकांत वाद पेटला असतांना मात्र राष्ट्रवादीने व घुले गटाने यात संयमाची भूमिका घेत अलिप्त राहणे पसंत केले आहे.

आपली बदनामी करण्याचे हे षड्यंत्र : आ. मुरकुटे
"नेवासे तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधि मंजूर करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत असल्याने विरोधक बेचैन झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्टटकून आपले नाव खराब करून आपली बदनामी करण्याचे हे षड्यंत्र आहे. असा आरोप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com