मला बेड्या ठोकण्याचा मुरकुटे यांचाच आदेश :  माजी आमदार

मला बेड्या ठोकण्याचा मुरकुटे यांचाच आदेश :  माजी आमदार

सोनई : "शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी "रास्ता रोको' केला म्हणून नाही, तर सूडबुद्धीचे राजकारण म्हणून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पोलिसांना "थेट बेडरूमपर्यंत जा, पण त्याला बेड्याच ठोका' असा आदेश दिल्यानेच माझ्या घराची झडती झाली,'' असा आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आज केला.

मुळा एज्युकेशन संस्थेबाबत हरित लवादाचा निर्णय, गडाखांचे अटक वॉरंट प्रकरण व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोनईत झालेल्या मेळाव्यात गडाख यांनी भावना व्यक्त केल्या. नानासाहेब रेपाळे, लक्ष्मण फाटके, सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख, बाजार समिती अध्यक्ष कडूबाळ कर्डिले, हरीभाऊ तुवर, भाऊसाहेब मोटे आदी उपस्थित होते. 

"नगरचा गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे एक प्रकारे गुंडांचीच टोळी आहे,' असा आरोप करून गडाख म्हणाले, ""सर्च वॉरंट नसताना गुन्हे अन्वेषण पथकाने बंधू प्रशांत व विजय यांना आरोपींप्रमाणे वागणूक दिली. वडिलांना पोलिसी खाक्‍या दाखविला. आम्हाला मानसिकदृष्ट्या उद्‌ध्वस्त करण्याचा हा प्रकार आमदार मुरकुटे यांच्या इशाऱ्यावरूनच झाला आहे. नगरच्या कैलास गिरवले यांच्या मृत्यूमागे गुन्हे अन्वेषणचाच हात आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत लवकरच तुमच्या मनातला निर्णय घेतला जाईल.'' 

कारभारी जावळे, दादासाहेब चिमणे, शरद वाकचौरे, शरद जाधव, नानासाहेब तुवर, बजरंग तुपे, अनिल मते, भैयासाहेब देशमुख यांचीही भाषणे झाली. सर्वांनी आमदार मुरकटे यांच्यावर निशाणा साधला. "मूँह में राम, बगल में छुरी'प्रमाणे कृत्य करणाऱ्या आमदारांचा कपाळी बुक्का व गळ्यातील तुळशीची माळ म्हणजे नौटंकी असल्याची टीका युवकांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com