भाजपकडून तालुकाध्यक्ष तावरे बेदखल 

अजित माद्याळे - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

गडहिंग्लज - भाजपचे कागल तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य परशराम तावरे जिल्हा परिषद निवडणुकीतून बेदखल झाले आहेत. सेनापती कापशी मतदारसंघातून त्यांच्या पत्नीला उमेदवारी न दिल्याने त्यांनी स्वत: गडहिंग्लज तालुक्‍यातील गिजवणे गटातून उमेदवारी दाखल केली. या ठिकाणी तर त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधातच भूमिका घेतली होती; परंतु गडहिंग्लजचे राजकारण वेळीच लक्षात आल्याने त्यांनी गिजवणेचेही मैदान सोडून दिले. यामुळे ते या निवडणुकीतूनच "एक्‍झिट' झाले आहेत. आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 

श्री. तावरे मूळचे सेनापती कापशीचे; परंतु कामानिमित्त ते मेट्रो सिटीतच असतात. मुळात गावाशी अल्प संपर्क असलेल्या तावरेंची छबी गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत नविद मुश्रीफ यांच्या विरोधात रिंगणात आल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. सेनापती कापशी गटातून त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद रिंगणात होते. त्यांच्या विरोधात "सर्व बाजूंनी' तगडा उमेदवार असावा म्हणून माजी आमदार संजय घाटगे यांनी तावरेंना पाचारण करून उमेदवारी दिली. त्यावेळचे मुश्रीफ विरोधातील वातावरण, घाटगे-मंडलिक आघाडीची ताकद व घाटगेंचा घरचा मतदारसंघ आदी कारणांमुळे तावरे निवडून आले; परंतु विजयानंतर काही महिन्यांतच तावरेंच्या भूमिकेला राजकीय रंग चढू लागला. ज्यांच्यामुळे ते निवडून आले, त्यांनाच बेदखल करण्याचा प्रयत्न झाला. दीड-दोन वर्षापूर्वीच त्यांची भाजपच्या कागल तालुकाध्यक्षपदी निवड झाली. 

दरम्यान, विधानसभा निवडणुका आल्या. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार व तावरेंना झेडपीत पाठवण्यास महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय घाटगे यांच्याच विरोधात तावरेंनी भाजपचा झेंडा घेऊन आमदारकीला शड्डू ठोकला. ज्या कापशी गटातून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले, त्याच गावात त्यांना 42 मते मिळाली. 

आता जिल्हा परिषद निवडणुकीत कापशी मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तेथून पत्नीला उमेदवारी मिळवण्याचा तावरेंचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी भाजपसह इतर गटनेत्यांकडेही चाचपणी केली; परंतु तालुकाध्यक्ष असलेल्या तावरेंना खुद्द पक्षानेही बेदखल केल्याचे स्पष्ट झाले. मागचा अनुभव पाठीशी असल्याने श्री. घाटगेंनीही त्यांना दाद दिली नसल्याचे समजते. कागल असुरक्षित वाटल्यानेच तावरेंनी गडहिंग्लजमधील गिजवणे गटाचा आधार घेतला. मुळात या गटातून भाजपने उमेदवारी जाहीर केली होती. तरीही तावरेंनी पक्षातर्फे व अपक्ष असे दोन अर्ज सादर केले. एबी फार्म नसल्याने पक्षाचा अर्ज छाननीत अवैध झाला; परंतु अपक्ष अर्ज शिल्लक होता. माघारीपर्यंत त्यांची लढण्याची भाषा होती; मात्र माघारीच्या दिवशी त्यांनी गिजवणेचेही मैदान सोडून दिले. 

* झेंडा अन्‌ बोर्डही उतरवला! 
पक्षातर्फे कुठेही उमेदवारी मिळणार नाही हे तावरेंच्या लक्षात आले. यामुळे तालुकाध्यक्ष झाल्यानंतर कापशीतील घरावर लावलेला भाजपचा भलामोठा झेंडा व बोर्डही त्यांनी उतरवल्याचे सांगितले जाते. कापशी खोऱ्यात याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: gadhinglaj bjp