गगनबावड्याचे तलाठी कोल्हापूर शहरात अपघातामध्ये ठार

निवास चौगले
सोमवार, 22 एप्रिल 2019

एक नजर

  • गगनबाबडा येथील तलाठी दसरा चाैक येथे अपघातात ठार
  • जयंत चंदनशिवे (वय 42, रा. बार्शी) असे मृत तलाठ्याचे नाव 
  • मतदान यंत्रे वाटपाच्या ठिकाणी निघाले होते चंदनशिवे

कोल्हापूर - सकाळी मतदान यंत्रे वाटप होते ते घेण्यासाठी निघालेले गगनबाबडा येथील तलाठी दसरा चाैक येथे अपघातामध्ये ठार झाले. जयंत चंदनशिवे (वय 42, रा. बार्शी) असे मृत तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  चंदनशिवे गगनबावडा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते मोटरसायकलवरून रमणमळा येथे मतदान यंत्रे वाटपाच्या ठिकाणी निघाले होते. पण दसरा चौक येथे त्यांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते ठार झाले. 

 

Web Title: Gaganbawda Talathi Dead in an accident in Kolhapur