तानंगमधील जुगार अड्डा उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

कुपवाड - तानंग (ता. मिरज) येथील मिरज पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या बंडू ढाब्याच्या शेजारचा जुगार अड्डा पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला. पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व गुंडा विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली. मालकासह १८ जणांना अटक करण्यात आली आहे. पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती सहायक निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मिरज- पंढरपूर रस्त्यालगत बंडू ढाब्याच्या शेजारी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकास मिळाली होती. त्यानुसार पंधरा पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून १८ जणांना अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून रोख रक्कम ८२ हजार ६३० रुपये, चार मोटारसायकली, १४ मोबाईल, तीन एलईडी टीव्हीसह एकूण पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

शिवम कला क्रीडा मंडळाच्या नावे बंडू कोळी याने रमी क्‍लब सुरू केला आहे. मात्र त्याच्या मागे एका खोलीत  तो जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी प्रत्यक्षात रमी क्‍लबमध्ये कोणीच नव्हते. तेथील टेबले मोकळीच होते. मात्र त्याच्या मागेच असलेल्या  तीन पानी जुगार अड्डयावर जुगार खेळण्यासाठी  गर्दी होती. तेथे छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. उपनिरीक्षक रमेश कसबेकर तपास करीत आहेत.

यांना झाली अटक...
बंडू ढाब्याचे मालक बंडू सिद्धू कोळी (वय ४८, तानंग), सतीश मारुती मोरे (वय ४७), वसीम असलम देसाई (वय ३१), सोमनाथ नारायण चव्हाण (वय ४२), कौसिक सलीम जमनावाले (वय २५), मेहबूब फकरूद्दीन शेख (वय ४४), सलीम खुद्दबुद्दीन पिरखान (वय ३४), सोहेल शमशुद्दीन गवंड (वय २२), इतिहास लक्ष्मण मोरे (वय ४२), सोहेल गफूर सुभेदार (वय २२, तासगाव), अजहर लियाकत पठाण (वय २७), सुनील मनोहर माने (वय ३९), महंमद इस्माईल शेख (वय २७), आकाश किशोर शेळके (वय १९), नितीन कृष्णा कांबळे (वय ३२), कबीर इमाम ढालाईत (वय ५५), रणजित लक्ष्मण सूर्यवंशी (वय ४५, सर्व मिरज), विजय श्रीधर माळी (वय २७, तासगाव) अशी त्यांची नावे आहेत.

Web Title: gambling sport in Tangal destroyed