सर्व शिक्षा अभियानात 'गमत्या चेंडू'ची निवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

लहान मुलांसाठी मी पुष्कळ लेखन केले. त्याची दखल सर्व जाणकारांनी घेतली आहे. आता "गमत्या चेंडू' पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुरवणी वाचनात निवडले गेल्याने ते योग्य वयाच्या वाचकांपुढे जाईल, याचे समाधान आहे. 
- बी. एस. कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक व पक्षीमित्र

सोलापूर ः येथील ज्येष्ठ लेखक आणि पक्षीमित्र बी. एस.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या "गमत्या चेंडू' या बालकथेच्या पुस्तकाची सर्व शिक्षा अभियानात निवड झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने पुरवणी वाचनासाठी हे पुस्तक निवडले आहे. 

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकाचे वितरण होत आहे. सोलापूरच्या बालकथा लेखकास अशा पद्धतीचा मान प्रथमच मिळत आहे. याआधी बी. एस. कुलकर्णी यांच्या पक्ष्याबद्दलच्या लेखनाचा समावेश पाठ्यपुस्तकात झाला आहे. तथापि, पूर्ण बालकथेचे पुस्तक पुरवणी वाचनासाठी निवडले जाण्याची सोलापूरच्या साहित्य विश्‍वातील ही पहिलीच वेळ आहे. "गमत्या चेंडू' लहान मुलीची टीव्ही पाहण्याची सवय मोडतो, खोड्या करणाऱ्या वांड मुलाला वठणीवर आणतो, अशा स्वरूपाचे कथानक आहे. पुण्याच्या चंद्रकला प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचेही यासाठी सहकार्य लाभले आहे. 

लहान मुलांसाठी मी पुष्कळ लेखन केले. त्याची दखल सर्व जाणकारांनी घेतली आहे. आता "गमत्या चेंडू' पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुरवणी वाचनात निवडले गेल्याने ते योग्य वयाच्या वाचकांपुढे जाईल, याचे समाधान आहे. 
- बी. एस. कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक व पक्षीमित्र

Web Title: gamtya chendu in sarv Shiksha Abhiyan