लाल मातीतल्या  हिऱ्याचे स्मारक रखडलेच 

NVK20A01187_pr.jpg
NVK20A01187_pr.jpg

नवेखेड (सांगली) : नवेखेड (ता. वाळवा) येथील दिवंगत पैलवान पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांचे त्यांच्या जन्मगावी छोटेखानी स्मारक व्हावे ही कुस्ती शौकिनांची मागणी गेली सहा वर्षे प्रलंबित आहे. त्यांच्या सहावा स्मृतिदिन पुन्हा ग्रामस्थांनी स्मारकाची मागणी केली आहे. 

नवेखेड सारख्या ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पैलवान गणपतराव खेडकर याने लाल मातीशी इमान राखत कुस्ती मध्ये आपले नाव अजरामर केले. कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेस तालमीत त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तब्बल सहा फुटांची उंची प्रचंड कुस्ती मेहनत घेत त्यांनी आपल्या कुस्ती करकीर्दीस सुरवात केली.

डाव्या पवित्रयात लढणारे खेडकर पैलवान डोळ्याचे पाते लवते न लवते तोच निकाली कुस्ती करत असे कुस्तीचे जाणकार आजही सांगतात पोकळ घिस्सा हा त्यांचा हुकमी डाव दररोज दोन हजार जोर, चारशे सपट ,अडीच हजार बैठका ,खासबाग मैदानावरील जिन्याची 50 वेळा चढ उतार करणे, पाच मैल धावणे असा खेडकर यांचा रोजचा सराव होता या जोरावरच त्याने अवघ्या 21 व्या वर्षी 1964 साले अमरावती येथे तिपन्नाअंकलीकर या सोलापूरच्या मल्लास चित्रपट करीत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली

दुसऱ्या वर्षी नाशिकला मोहनसिंग भिसेनी या वर्ध्याच्या मल्लास चित्रपट करीत दुसऱ्यांदामहाराष्ट्र केसरीची गदा पटकावून पहिले डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकाविला. कुस्तीमध्ये अस्सल हिरा असणारे खेडकर पैलवान मात्र नेहमी उपेक्षित राहिले. त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या कुस्ती कारकिर्दीची सुरवात केली. ती गावची तालीम सध्या जमीनदोस्त झाली आहे. त्या ठिकाणी तालमीचे पुरुज्जीवन व छोटेखानी स्मारकव्हावे ही मागणीदुर्लक्षित झाली आहे.त्यामुळे नवेखेड येथील ग्रामस्थ व कुस्ती प्रेमी मध्ये नाराजी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com