दैव बलवत्तर म्हणून वाचला; टोलनाक्याला धडकून टिप्परला आग

दरम्यान गणेबैलजवळ उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याला त्याची धडक बसली.
दैव बलवत्तर म्हणून वाचला; टोलनाक्याला धडकून टिप्परला आग

खानापूर : गणेबैल (ता. खानापूर) येथे उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या खडीवाहू टिप्परची जोराची धडक बसून अपघात घडला. यात टिप्परची डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टिप्पर पूर्णतः जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र टिप्परचे मोठे नुकसान झाले आहे.

दैव बलवत्तर म्हणून वाचला; टोलनाक्याला धडकून टिप्परला आग
भाजपचं 'ऑफर लेटर' रस्त्यावर पडलंय का?

सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास उत्तमकुमार बापशेट (रा. टिळकवाडी-बेळगाव) यांच्या मालकीचा दहा चाकी टिप्पर खडी घेऊन रमेश तमुचे (रा. माडीगुंजी) हा चालक रामनगर येथे निघाला होता. दरम्यान गणेबैलजवळ उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याला त्याची धडक बसली. धडक इतकी जोराची होती की यात डिझेल टाकी फुटून आगीचा भडका उडाला. प्रसंगावधानाने चालकाने टिप्पर मधून बाहेर उडी घेतली. काही क्षणातच संपूर्ण टिप्परने पेट घेतला. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली मात्र यात टिप्परचे मोठे नुकसान झाले. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे .

दैव बलवत्तर म्हणून वाचला; टोलनाक्याला धडकून टिप्परला आग
कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलानं नको - चंद्रकांत पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com