गर्दीमुळे शहरात गजबजले रस्ते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ‘भावा माग-पुढ जाम झालंय. ओव्हरटेक करू नको,’ असं एकमेकांना सूचना देणाऱ्या आरोळ्या आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापनेसाठी निघालेल्या गणेशमूर्तींमूळे शहरातील रस्ते जाम झाले. 

सकाळ नऊपासूनच शहर परिसरात असणाऱ्या आणि शहरात असणाऱ्या गणेश मंडळांनी शहरातील शाहुपूरी, गंगावेश, लक्षतीर्थ व बापट कॅंप येथे गर्दी केली. 

शहरातील शाहुपूरी व गंगावेश येथील कुंभार गल्लीतून मोठ्या गणेशमुर्ती घेवून जाण्यासाठी एकच झुंबड उडाला. ट्रक, ट्रक्‍टर, टॅंम्पो, जीप किंवा इतर चारचाकी वाहनातून गणेशमुर्ती घेवून जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. महत्वाच्या रस्त्यांवर गणेश मंडळांचे मोठे मंडप असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. बालिंगा, कुडित्रे, कळे ते गगनबावड्यापर्यंतच्या गणेश मंडळांनी गंगावेश येथील कुंभार गल्लीतून गणेश मुर्ती घेवून जात होते. त्यामुळे गंगावेशपासून रंकाळवेश, फुलेवाडीपर्यंतचे सर्व मार्ग ठप्प झाली. सायंकाळी सायनंतरही या गर्दीत मोठी वाढ झाल्याने वाहतूक पोलीसांची तारांबळ उडाली. 

शाहूपरी उद्यमनगर येथील कुंभार गल्लीत गणेशमुर्ती घेण्यासाठी राजारामपूरी, नागाळ पार्क येथील गणेश मंडळाने जल्लोषात हजेरी लावली. त्यामुळे, पद्मा टॉकिज ते फोर्ड कॉर्नरपर्यंत वाहनांची रेलचेल राहिली. याशिवाय, दसरा चौक ते व्हिनस कॉर्नरपर्यंतही गणेश मुर्ती घेवून जाणारी वाहनांमुळे वाहतूकी अडथळा आला. मात्र कार्यकर्त्यांनीच एकमेकांना आवाहन करत आपआपले गणेश मुर्ती सुरळीतपणे घेवून जात होते. लक्षतीर्थ वसाहतीतूनही मोठ्याप्रमाणा गणपती शहरातील काही मंडळांनी घेवून आले. शहरात जागा नसल्याने शहराबाहेर मोठ्या गणेशमुर्ती तयार करून त्या सायंकाळी शहरात आणल्या जात होत्या. त्यामुळे रंकाळा परिसर वाहनांनी तुंडूब भरलेला  दिसत होता.

Web Title: ganesh festival 2017 kolhapur ganesh ustav crowd

टॅग्स