'अक्षरगणेश' कलाकृतीला यंदा सातासमुद्रापार मागणी

अनिल चौधरी
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

निघोज : गणरायाच्या आगमनाची तयारी सध्या सर्वत्र जोरात सुरू असताना नावातून तयार करण्यात आलेल्या 'अक्षरगणेश' कलाकृतीला यंदा सातासमुद्रापार मागणी वाढली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात इंटरनेट,सोशल मीडिया ,फेसबुक व व्हाटसप आदी अॅपवर आपल्या स्वतःच्या नावातून साकारलेला गणेशा यंदा अनेकांना भावला असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात सोशल मीडियावर अक्षरगणेशाचा महिमा मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे.

पारनेर तालुक्यातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवङे या अवलिया तरूणांच्या कलाकृतीने सध्या सर्वांना मोहिनी घातली आहे.

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पारनेर येथील महाविद्यालयात कलाशिक्षक असणारे ज्ञानेश्वर कवङे यांनी तीन वर्षांपुर्वी अक्षरगणेश कलाकृतीचा श्रीगणेशा केला. प्रारंभी एक छंद म्हणून जोपासलेल्या या कलेचा आता मोठा विस्तार वाढला आहे.

व्यक्तीच्या नावात अक्षरगणेश रेखाटन करून त्या व्यक्तीला ती कलाकृती वाढदिवसाला भेट देऊन त्यांचा वाढदिवस द्विगुणित करण्यासाठी वाढदिवसाची अनोखी भेट ते देत असे. नगर जिल्हासह राज्यातील नामवंत राजकारणी,प्रसिद्ध खेळाडू, शिक्षक, मित्र, समाजसेवक आदीच्या नावात अक्षरगणेश कलाकृती रेखाटुन भेट दिली आहे.

सध्याच्या इंटरनेटच्या युगात गणेशोत्सव काळात व्हाटसप,फेसबुक व सोशल मीडियावर आपल्या नावातील अक्षरगणेश वॉलपेपर, प्रोफाईलवर ही कलाकृती ठेवण्यावर अनेकांचा कल वाढला आहे.त्यातून नगर जिल्ह्य़ासह राज्यभरातून व परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयाकङून इंटरनेटवर ही कलाकृती तयार करून देण्याची मागणी वाढली असल्याचे कवङे यांनी सांगितले. तसेच एक छंद म्हणून जोपासलेली ही कला आता व्यवसायिक रूप धारण करत असल्याने यातून दोन पैशाची कमाई मिळत आहे.आहे.

यंदाच्या गणेशोत्सव काळात या अक्षरगणेश कलाकृतीला मोठी मागणी असल्याने सुमारे हजार कलाकृती तयार केल्या असून अजूनही मागणी वाढत आहे. मात्र आता परदेशातूनही मागणी होत असल्याने मला मोठे समाधान लाभले आहे असेही कवङे यांनी सांगितले.

वङील हेच माझे गुरु!
रयत शिक्षण संस्थेत माजी शिक्षक असणाऱ्या रामदास कवङे या माझ्या वडिलांनी मला बालपणापासून हस्ताक्षराचे बाळकडू दिले. त्यामुळे क्षणार्धात अक्षरातून गणेशाची कलाकृती रेखाटन करण्याची कला मी शिकलो. अन् आज ही कला व्यवसायिक रूप घेत असुन  माझे वङील हेच माझे गुरु असल्याचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवङे हे अभिमानाने सांगतात.

Web Title: Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav Akshar Ganesh