विसर्जन मिरवणुकीहून परतणारा शाळकरी मुलाचा ट्रॅक्टरखाली मृत्यू

सचिन शिंदे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

गणेश सजावटीचे साहित्य पुन्हा शाळेत ठेवायचे होते. म्हणून ते निघाले होते. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेला शिवराज ट्रॅक्टरखाली पडला.

कऱ्हाड : गणेश विसर्जन मिरवणूक उरकून परतणारा शाळकरी मुलगा ट्रॅक्टरखाली ठार झाला. काल (गुरुवारी) दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली. शिवराज संतोष शेलार (वय १४) असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव आहे.

छत्रपती विद्यालयात बसविलेल्या गणेश मुर्तीचे आज (गुरुवारी) गावालगत असलेल्या नदीत विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेजवळ निघाले होतेे. त्यावेळी विसर्जन मिरवणुकीसाठी आणलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसून काही विद्यार्थी पुन्हा शाळेत आले. गणेश सजावटीचे साहित्य पुन्हा शाळेत ठेवायचे होते. म्हणून ते निघाले होते. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेला शिवराज ट्रॅक्टरखाली पडला. ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तो ठार झाला.

या घटनेमुळे परिसरात वातावरण सुन्न जाले होते. हळहळ व्यक्त होत होती. शिवराज आईवडीलांना एकुलता होता. त्याला कलेची आवड होती. तो सर्व वाद्य वाजवत होता. गणेसोत्सवातही त्याने सक्रीय सहभाग घेतला होता. तो सध्या आठवीत शिकत आहे. त्याचे वडील शेती करतात. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: ganesh festival 2017 marathi news satara karad accident

टॅग्स